चाळीसगाव । तालुक्यातील वरखेडे येथे बसस्थानकाजवळ टपरीच्या आडोशाला कल्याण नावाचा मटका घेताना मेहुणबारे पोलीसांनी 22 फेब्रुवारी रोजी दुपारी 3.5 वाजता एकास अटक केली आहे. याबाबत माहिती अशी, तालुक्यातील वरखेडे येथील बस स्टॅन्ड वर टपरीच्या आडोशाला कल्याण नावाचा मटका घेत असल्याची माहिती मिळाल्यावरुन पोलीसांनी त्याठिकाणी 22 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता छापा मारला असता कल्याण नावाचा मटका घेतांना रविंद्र सोमसिंग गायकवाड (32) रा. वरखेडे ता. चाळीसगाव यास 310 रुपये रोख व सट्टा जुगाराच्या साधनांसह ताब्यात घेतले असुन पो.कॉ. कमलेश राजपुत यांच्या फिर्यादीवरुन आरोपी विरोधात मेहुणबारे पोलीस स्टेशनला 12 (अ) प्रमाणे कारवाई करण्यात आली.