चाळीसगाव । प्रतिनिधी । तालुक्यातील वरखेडे खुर्द येथील शिवारात वन खात्याच्या कर्मचार्यांसह ग्रामस्थांनी बिबट्याला घेरल्याचे वृत्त आहे.
मंगळवारी भल्या पहाटे वरखेडे खुर्द शिवारात यमुनाबाई तिरमली (७०) या महिलेच्या मृत्यूनंतर परिसरातील ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. या महिलेचे फक्त मुंडकेच काही अंतरावर सापडले होते. ग्रामस्थांनी शोध घेतला असता काही अंतरावरील एका शेतात त्या महिलेचे धड आढळून आले आहे. दरम्यान, या दुर्घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी एकत्रीतपणे बिबट्याचा शोध सुरू केला आहे. या ठिकाणी असणार्या आमच्या प्रतिनिधीच्या वृत्तानुसार ग्रामस्थांना आता एका परिसरात बिबट्या आढळून आला आहे. जमावाने या बिबट्याला घेरल्याची माहितीदेखील मिळाली आहे.
(सविस्तर माहिती लवकरच)