भडगाव । तालुक्यातील वरखेड येथील 12 वीच्या वर्गात शिक्षण घेणारी मनिषा देविदास शिरसाठ ह्या 18 वर्षीय तरूणीने प्रेमसंबधातून विहरीत घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी 11 रोजी सकाळी 10 वाजता उघडकीस आली. तरुणीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणार्या तरुणांविरुध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी तरुणीच्या नातेवाईकांनी केली असल्याने तरुणीच्या मृत्युबद्दल संशय व्यक्त करण्यात येत आहे. आत्महत्या केली आहे की तिचा खुन. हत्या की आत्महत्या आहे. याबाबत अधिक माहीती असे की देविदास अमृत शिरसाठ यांच्या फिर्यादीवरून मनिषा देविदास शिरसाठ या तरूणीचे आरोपी अजय भगवान राजपूत रा.वरखेड या तरूणानाशी प्रेमसंबध होते. मनिषा शिरसाठ गेल्या दोन दिवासापासून बेपत्ता होती. त्याबाबत भडगाव पोलीस स्टेशनला हरवल्याची खबर देण्यात आली होती. सकाळी 10 वाजता वरखेड शिवारात संजय दयाराम राजपूत यांच्या विहरीत प्रेत आढळून आल्याने आरोपी अजय राजपुत याच्या विरूद्ध भडगाव पो.स्टे.ला गुन्हा दाखल आला आहे.
या घटननेचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अरविंद पाटील करत आहे. 12 वीची परीक्षा सुरु असल्याने बुधवार रात्री मनिषा ही घराच्या गच्चीवर अभ्यास करत होती. रात्री 10-30 वाजेच्या सुमारास वडील देविदास शिरसाठ हे मनिषाला जेवणासाठी बोलविण्यास गेले असता. मनिषा अभ्यास करताना आढळुन आली नाही. चौकशी दरम्यान संशयित अजय राजपुत यांने मनिषाला रात्री मी घरी सोडले होते. नंतर ती कोठे गेली हे मला माहित नाही अशी माहिती दिली होती. दरम्यान आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास गावालगतच असलेल्या संजय दयाराम राजपुत याच्या शेतातील विहीरीत मनिषाचा मृत देह आढळुन आला. मयत मनिषा शिरसाठ हीचे वर रात्री उशिरा वरखेड येथे अत्यसंस्कार करण्यात आले.