भडगाव । तालुक्यातील वरखेड येथे भटाई माता व पुत्र भटू भैरवनाथाची दर वर्षा प्रमाणे यावर्षी देखिल यात्रा उत्साह होत आहे. 3 फेब्रुवारी पासुन ते 5 फेब्रुवारी पर्यंत ही यात्रा उत्सव होणार असुन 3 व 4 रोजी हभप प्रसाद महाराज, हभप हिंमत महाराज यांचा किर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच 5 रोजी लोकनाट्य तमाशा आयोजित केला.यात्रेत विविध प्रकारचे दुकाने धाटतात पालखी व झुले यात्रेचे आकर्षण असतात. यात्रेत भाविका कडुन नवस केला जातो तर काही नवस फेडायला येतात. सेवेकरी तुळसाबाई बाजीराव पाटिल व भक्त परीवार वरखेड यांनी यात्रेत येण्यास आवाहान केले आहे.