वरणगांवात जनसंवाद यात्रेचे जल्लोषात स्वागत

वरणगांव : प्रतिनिधी
काँग्रेस कमिटीच्या जन संवाद यात्रेचे वरणगाव येथील बस स्थानक चौकात वरणगाव शहर काँग्रेस कमिटीतर्फे जल्लोषात स्वागत करण्यात आले . यावेळी काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष श्री. प्रदीपदादा पवार यांनी जनसंवाद यात्रेबाबत मार्गदर्शन करतांना ही यात्रा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. नाना पटोले यांच्या आदेशाने पूर्ण जळगाव जिल्ह्यात फिरणार असल्याचे सांगीतले . वरणगाव येथून ही यात्रा भुसावळकडे रवाना झाली जनसंवाद यात्रे सोबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष डॉ श्री. जगदीश पाटील, एस. सी . विभागाचे काँग्रेसचे प्रदेश सचिव राहुल मोरे, मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष दिनेश पाटील, विजय मगरे , अॅड. राहुल शेळके एस . सी . विभागाचे जिल्हा अध्यक्ष अॅड. प्रदीप पाटील, संजय पाटील, भुसावल तालुकाध्यक्ष शैलेश बोदडे, वरणगाव काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष अशफाक काझी, गजानन देशमुख तालुका उपाध्यक्ष, संदीप माळी, अकील शहा अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष, पप्पू काझी, अजय बिऱ्हाडे, प्रमोद शिरसाठ, फुलसिंह पाटील, जीवनसिंह पाटील, श्यामलाल सुरवाडे, व काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.