वरणगांव फॅक्टरीत टी 55 टँकचे लोकार्पण

0

वरणगाव– 1971 युद्धात महत्त्वाची कामगिरी बजावलेल्या टी 55 टँकचा लोकार्पण सोहळा आयुध निर्माणी बोर्डाचे अतिरिक्त अध्यक्ष सौरभकुमार यांच्या हस्ते आयुध निर्माणी वरणगाव वसाहतीत झाला. सौरभ कुमार यांच्या हस्ते आयुध निर्माणीत स्टोअर्स, इन्सास तिसरी लाईन, कॅन्टीन गार्डनचे उद्घाटन करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
महाप्रबंधक एस.चटर्जी, ले.कर्नल पी.जी.निंबालकर, अपर महाप्रबंधक गुप्ता, कामगार युनियनचे सुनील महाजन, सी.जी.पवार, इंटक युनियनचे महेश पाटील, रवी देशमुख, भारतीय महासंघाचे सचिन चौधरी, व्ही.डी.जगताप, असोशिएनचे, पदाधिकारी, कार्य समिती सदस्य तसेच कर्मचारी उपस्थित होते.