वरणगावची बेपत्त्ता मनोरुग्ण महिला सहा वर्षानंतर कुटूंबात परतली

0

जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाचे सहकार्य ः घरातून निघून गेल्याने त्रिवेंद्रमला पोहचली होती

जळगाव– सहा वर्षापूर्वी वरणगाव येथील बेपत्ता 35-40 वर्ष वयोगटातील वर्षीय मनोरुग्ण महिला घरुन निघून बेपत्ता झाली होती. त्रिवेेंद्रम येथे निघून गेलेल्या मनोरुग्ण महिलेला जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाने बुधवारी वरणगाव येथील कुटूंबियांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. सहा वर्षानंतर बेपत्ता बहिण मिळाल्याने भावासह कुटुंबियांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.

वरणगाव येथील मनोरुग्ण गौरी (बदललेले नाव) ही वेडेपणाच्या भरात घरुन निघुन गेली होती. यानंतर तिच्या कुटुंबियांनी तिचा सर्वत्र शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही. यानंतर कुटुंबियांनी याबाबत जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. यानंतर कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार महिला बालविकास अधिकारी यांनी जिल्हा विधी सेवा प्राधीकरण यांच्याकडे पत्र व्यवहार केला होता.

त्रिवेंद्रम येथील विधी सेवा प्राधीकरणाला पत्रव्यवहार
जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाने त्रिवेंद्रम येथील जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाचे सचिव सी.यू.शेख यांच्याशी संंपर्क साधला व पत्रव्यवहार केला. गौरी बेपत्ता झाल्यानंतर त्रिवेंद्रम येथे पोहचली होती. याठिकाणी मनोरुग्ण महिलांवर काम करणार्‍या बेनिडीक्ट मेन्नी सायको सोशल रिहॅबीलीटेशन सेंटर मध्ये दाखल असल्याची माहिती जिल्हा प्राधीकरणाला मिळाली.

त्रिवेंद्रम येथील संस्थेने जळगावात आणले
त्रिवेंद्रम येथून महिलेस आणणे तिच्या कुटुंबियांना आर्थिक परिस्थितीनुसार शक्य नव्हते. यानंतर जळगाव जिल्हा विधी प्राधीकरणाने त्याबाबत महिला दाखल संस्थेला संपर्क केला. व परिस्थितीचे अवलोकन करुन जळगावात येण्याची विनंती केली. यानुसार संस्थेचे दोन महिला व एक पुरुष सदस्य मंगळवारी मनोरुग्ण गौरीसह शहरात दाखल झाले. यादरम्यान महिलेला एक दिवस आशादीप वसतीगृहात ठेवण्यात आले. यानंतर दुसर्‍या दिवशी जिल्हा विधी प्राधीकरणाने महिला बालविकास अधिकारी यांच्या मार्फत कुटुंबियांना कळविले. व महिलेला बुधवारी तिच्या भाऊ तसेच कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले.यावेळी कुटुंबियांच्या चेहर्‍यावर गगनात मावनेसा आनंद होता. त्यांनी त्रिवेंद्रम येथील संस्था, जिल्हा विधी प्राधीकरण यांचे आभार मानले आहे.