वरणगावचे गायक राहुल तायडे आंबेडकर जयंतीदिनी आकाशवाणीवर

0

वरणगाव । भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयती निमित्ताने वरणगाव येथील युवा साहित्यिक गायक कलावंत राहुल महिपत तायडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्र निर्मितीतील योगदान या विषयावर सादर केलेले भाषण 14 एप्रिल रोजी जळगाव आकाशवाणी केंद्रावर युवा वाणी कार्यक्रमा अतंर्गत सायकाळी 5.30 वाजेला प्रसारीत केले जाणार आहे.

राहुल तायडे यांच्या या कार्यक्रमाबद्दल त्यांचे बोधिज प्रकाशन अकोला, सत्यशोधक साहित्य परिषद जळगाव, संत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय संस्था खान्देश, एकता साहित्य मंडळ जळगाव, अपंग विकास साहित्य मंडळ जळगाव, अखिल भारतीय साहित्य संस्थान जळगाव, महाराष्ट्र दलित साहित्य अकादमी भुसावळ, स्वामी इन्स्टिट्युट व स्फुर्ती महिला मंडळ जळगाव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय भुसावळ, सास्कृतिक मंडळ चंद्रपुर, सृजन साहित्य संघ मुर्तीजापूर, सांस्कृतीक मंडळ जामनेर, बीनेस कलर अ‍ॅण्ड पॅटर्न नागपुर, साप्ताहीक लक्षवेध भिवंडी, पाक्षिक चिंतन आदेश पुणे, ग्रामीण पत्रकार संघ इत्यादींनी अभिनंदन केले आहे.