वरणगावच्या तरुणाचा नदीत बुडून मृत्यू

वरणगाव : शहरातील नारी मळ्यातील रहिवासी विजय एकनाथ माळी ( 28) यांचा भोगावती नदीत बुडल्याने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. वरणगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली. मजुरी करून चरीतार्थ चालवणार्‍या एकनाथ माळी यांचा एकुलता एक मुलगा विजय याचा मंगळवारी अक्सा नगरकडे जाणार्‍या भोगावती नदीत बुडून मृत्यू झाला. गुरुवारी त्याचा मृतदेह नदीतील पाण्यात तरंगताना दिसला. बळीराम माळी यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास मजहर पठाण करत आहे.