भुसावळ- वरणगाव येथील नारी मळा भागातील 41 वर्षीय दुचाकीस्वाराचा महामार्गावरील चाहेल हॉटेलजवळ सोमवारी पहाटे मृत्यू झाला. मृत्यूचे नेमके कारण मात्र कळू शकले नाही. अजय जनार्दन बढे (41) असे मृताचे नाव आहे. महामार्गावरून प्रवास करीत असलेले योगेश सुनील चौधरी (झोपे वाडा, वरणगाव) यांना अजय बढे हे सोमवारी सकाळी त्यांच्या दुचाकीच्या बाजूला बेशुद्धावस्थेत आढळल्यानंतर त्यांनी बाजारपेठ पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी योगेश चौधरी यांच्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार जयराम खोडपे करीत आहेत. मयताच्या पश्चात आई व पत्नी, मुलगा असा परीवार आहे.