वरणगाव । श्रावण महिना म्हटला म्हणजे महादेव मंदिरात भाविकांची गर्दी होत असते. वरणगावचे महादेव मंदिर हे देखील जागृत देवस्थान असून 450 वर्षापूर्वी बांधण्यात आले आहे. या पुरातन मंदिराचा व परिसराचा कायापालट झाला आहे. भाविकांचे व पर्यटकांचे आकर्षण बनले आहे. येथे दर सोमवारी भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत असते. सोमवार 7 रोजी नारळी पौर्णिमा तसेच तिसरा श्रावण सोमवार असल्याने या मंदिरावर दर्शनासाठी भाविकांनी गर्दी होत असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाळणे, झोके, रेल्वे गाडी आदी खेळणे आली आहे.
साडेतीन शक्तीपीठांच्या प्रतिकृती लक्षणीय
श्रावण महिन्यात दर सोमवारी तालुक्यातून तसेच दुरवरुन हजारोंच्या संख्येने भाविक येथे येतात. येथील नागेश्वर महादेव मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून परिसरातच साडेतीन शक्तीपीठ देवीच्या मूर्तीची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. त्यात सप्तश्रृगी देवी गडाची प्रतिकृती निर्माण करण्यात आला आहे. गडावर सप्तश्रृंगीदेवी, तुळजाभवानी, कोल्हापुरची महालक्ष्मी, माहुरच्या रेणुकादेवी मुर्तीची स्थापना करण्यात आली आहे. महादेवाच्या दर्शनाने भाविकांची मनोकामना पूर्ण होते, असा भाविकांचा विश्वास आहे. प्राचीन काळातील पाऊलखुणा जपणारे वरणगावचे हे नागेश्वर मंदिर हजारों भाविकांचे श्रध्दास्थान बनले आहे. इंदौरच्या होळकर राजाच्या व ग्वाल्हेरच्या शिंदे राजाच्या पुरातन गोंदी संस्थेकडे आहे. मंदिराची व्यवस्था चंद्रकांत बढे, रमेश सरोदे, भागवत पाटील, वसंत पाटील, अनिल वंजारी, अनिल पाटील, किशोर पटेल, अशोक बढे, साधना ढाके, सुरेश माळी, भागवत पाटील, भोपळे महाराज (पुजारी) हे पाहतात. भाविकांना पुजा, दुकाने लावण्यासाठी ओटे तयार करण्यात आलेली आहे. तसेच येथे दिवसभर धार्मिक कार्यक्रम होत असतात. यंदा भाविकांची जास्त गर्दी होत असल्याने या ठिकाणी वरणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरिक्षक जगदीश परदेशी, पीएसआय निलेश वाघ, पीएसआय प्रदिप ठुबे, पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील वाणी, राहुल येवले, वाहतूक पोलीस महेंद्र शिंगारे आदींनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.