वरणगावच्या बढे पतसंस्थेतील दोन संचालकांना अटक

0

वरणगाव : ठेवीची मुदत संपूनही रक्कम परत न करणार्‍या वरणगावच्या चंद्रकांत हरी बढे पतसंस्थेच्या दोन संचालकांना जिल्हा ग्राहक मंचाच्या आदेशानुसार अटक करण्यात आली.

ग्राहक मंचाने उभयंतांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. बळीराम केशव माळी व भिंकू शंकर वंजारी अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संचालकांची नावे आहेत. या कारवाईमुळे संचालकांच्या गोटात मोठीच खळबळ उडाली.