वरणगावच्या विकासरथात मोगर्‍या लावणारे तोंडघशी पडणार

0

जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांची फटकेबाजी ; शहरात रस्ता कामाचे उद्घाटन

वरणगाव- वरणगाव शहरात वर्षभरात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात विविध विकासकामे करण्यात आले असून शहरात विकासाची घोडदौड सुरू असून या विकासरथाला मोगर्‍या लावणारे अनेक असतात व अशांकडे दुर्लक्ष करणे योग्य असते, अशी फटकेबाजी कुणाचेही नाव न घेता भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी येथे केली. वरणगावातील नगरसेविका नसरीनबी साजीद कुरेशी यांच्या प्रभागातील पेव्हर ब्लॉक बसवण्यासह रस्ता कामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.

कोशिश करने वालोंकी कभी हार नहीं होती
उदय वाघ म्हणाले की, न्यायालयीन प्रकरणांबाबत नगराध्यक्षांनी चिंता न करता न्यायदेवतेवर विश्‍वास ठेवावा, जलसंपदा मंत्री वरणगाव विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असे आश्‍वासनही त्यांनी प्रसंगी देत
वरणगाव नगराध्यक्ष सुनील काळे व त्यांच्या टीमने शहरात विविध विकासकामे केली असून विकासरथ चालवताना अनेक मोगर्‍या लावणारेही असतात मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे योग्य असून त्यांच्या मोगर्‍या उलट्या पडशिवाय राहणार नाही. ‘मन चंगा तो कठोती मे विकास की गंगा’ असे त्यांनी सांगत ‘लहेरो से डरकर नौका पार नही होती, कोशीश करणे वालोंकी कभी हार नही होती’, असेही ते म्हणाले.

वरणगाव पालिका विकासात अग्रेसर -आमदार
1आमदार स्मिता वाघ म्हणाल्या की, मी तत्कालीन जिल्हा परीरषदेच्या अध्यक्ष असतांना वरणगाव पाणीपुरवठा योजनेसाठी 30 लाख 97 हजार 897 रुपयांची लोकवर्गणी भरण्याचे भाग्य आपल्याला मिळाले होते व वरणगाव नगरपरीषद अनेक अडथळ्यांची शर्यत पार करीत विकासाबाबत जिल्ह्यात अग्रेसर ठरत आहे. सूत्रसंचलन माजी उपसरपंच शेख सईद भिखारी यांनी तर आभार माजी सरपंच सुखलाल धनगर यांनी मानले.

यांची होती प्रमुख उपस्थिती
प्रसंगी आमदार स्मिता वाघ, नगराध्यक्ष सुनील काळे, नगरसेविका नसरीनबी साजीद कुरेशी, नगरसेवक गणेश चौधरी, ईरफानभाई पिंजारी, माजी उपसरपंच साजीदसेठ कुरेशी, माजी सरपंच सुखलाल धनगर, शेख सईद, ईमामसेठ कुरेशी, गोगाशेठ, पप्पू जकातदार, शब्बीर पठाण, जावेद शेख, सोहिल कुरेशी आदींची उपस्थिती होती.