वरणगावच्या विकासासाठी प्रशासनाची भूमिका महत्वाची

0

नगराध्यक्ष सुनील काळे ; प्रभारी मुख्याधिकार्‍यांनी पदभार स्वीकारला

वरणगाव- शहर विकासात प्रशासनाची अर्थात मुख्याधिकार्‍यांची भूमिका महत्वाची असून लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या निर्णयाची प्रशासनाने अंमलबजावणी करणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष सुनील काळे यांनी येथे केले. प्रभारी मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी पदभार घेतल्यानंतर आयोजित छोटेखानी कार्यक्रमात ते बोलत होते. नगराध्यक्ष काळे म्हणाले की, वरणगाव शहर अजून इतर शहरांच्या तुलनेत विकासाच्या बाबतीत तहानलेले आहे. ती विकासाची तहान भागवण्याची आहे त्यात शासनाच्या विविध योजनेचे प्रस्ताव तयार करण्याचे काम हे मुख्यधिकारी व प्रशासनाचे आहे. ते प्रस्ताव लकवकर तयार करून मंजुरीसाठी तत्काळ पाठवावे, असे आवानही त्यांनी केले.

प्रभारी मुख्याधिकार्‍यांचा सत्कार
सावद्याचे मुख्याधिकारी सौरभ जोशी यांच्याकडे वरणगावचा तात्पुरता पदभार सोपवण्यात आला असून बुधवारी पदभार स्वीकारला. प्रसंगी नगराध्यक्ष सुनील काळे व उपनगराध्यक्ष शेख अखलाक यांच्या हस्ते जोशी यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देतांना मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी सांगितले की, वरणगाव नगरपरीषदेने केलेल्या सत्काराने मी भारावलो आहे पण सत्काराचे ओझे पाहून मला त्यात विकासाचा अनुशेष भरण्याचे आव्हान दिसून येत असून शहराच्या विकासकामांना निश्‍चितच आपण गती देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यांची होती उपस्थिती
नगरसेविका माला मेढे, मेहनाजबी पिंजारी, नगरसेवक राजेंद्र चौधरी, रवींद्र सोनवणे, विष्णू खोले, गणेश चौधरी, नितीन माळी, अरुणा इंगळे, विकीन भंगाळे, रोहिणी जावळे, जागृती बढे, वैशाली देशमुख, समाजसेवक संजीव कोलते, समाधान चौधरी, संभाजी देशमुख, बांधकाम अभियंता डिगंबर वाघ आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन संजीव माळी यांनी केले. प्रसंगी पालिकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.