वरणगाव । सिध्देश्वरनगर येथे पोलिस पंचायतीच्या माध्यमातून रोजा इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रम दरम्यान मुस्लीम बांधवांना रोजा इफ्तार रमजान माहिन्याच्या उपवास सणानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी वरणगाव पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरिक्षक निलेश वाघ, पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील वाणी, मजहर तडवी यांच्याहस्ते रोजा इफ्तार कार्यक्रम संपन्न करण्यात आला. यावेळी पोलिस पंचायत व महिला दक्षता समिती सदस्या सविता माळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, रमजान हा पावित्र्याचा उत्सव अल्याचे सांगितले. कस्तुरा इंगळे, अनिता जैयकर अनिता निकम, रिजवानबी, बद्रू निस्साबी, शकीलाबी, शांताबाई साबळे, सरुबाई वाघमारे आदी हिंदू मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या.