वरणगावला शेती वीज ग्राहकांचा मेळावा 

0
वरणगाव : उपविभागीय वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाकडून शेती वीजग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात शेतकर्‍यांच्या शेती विज बिलाविषयी तक्रारी मांडण्यात आल्या. वरणगाव, वरणगाव ग्रामीण 1, 2, आचेगांव, तळवेल या कक्षा अंतर्गत शेती वीज ग्राहक उपस्थित होते. 83 ग्राहकांचे अर्ज स्विकारून त्वरीत कक्ष प्रमुखाकडून स्पॉट परीक्षणासाठी पाठविण्यात आले आहे. सोमवारपर्यंत स्पॉट परीक्षणाची माहिती आल्यानंतर त्वरीत वीज बिलात दुरूस्ती करण्यात येईल, असे उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता जे.एस.महाजन यांनी यावेळी सांगितले.
यांची होती उपस्थिती
उपकार्यकारी विभागीय अभियंता जे.एस.महाजन, मुक्ताईनगर विभागाचे कार्यकारी अभियंता महेश पाटील,  साहाय्यक अभियंता ए.डी.साळवे, नितीन महाजन, कनिष्ठ अभियंता शितल तायडे, अखिलेशकुमार कुशवाह, उपविभागाचे चेतन चौधरी, अरूण घुले, दुर्गेश चौधरी, तुषार झोपे, एन.सी.जोशी, रोहित चपाले, रोशन चौधरी, मयुर धांडे, धमेंद्र राऊळ  आदि उपस्थित होते.