वरणगावातही होणार एलईडीचा लखलखाट

0

जलसंपदा मंत्र्यांच्या पुढाकाराने वरणगावात नवीन एलईडीचा करार

भुसावळ- वरणगाव शहरासाठी मंगळवारी राज्याचे जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात वरणगावचे नगराध्यक्ष सुनील काळे व नगरसेविका मेहनाजबी इरफान पिंजारी, ईइसीएलचे राज्य व्यस्थापकीय संचालक दीपक कोकाटे, उपसंचालक अमित चोपडे, समाजसेवक इरफान पिंजारी, कायार्र्लयीन अधीक्षक गंभीर कोळी, कुंदन माळी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यामध्ये केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून ईइएसएल या कंपनीसोबत संपूर्ण शहरातील वीज खांबावर एक हजार 500 एलईडी लाईट बसवण्याचा महत्वपूर्ण करार करण्यात आला. यामुळे भुसावळ शहराप्रमाणेच वरणगाव शहरातही एलईडी बल्बचा लखलखाट होणार आहे.

वीज बिलाची होणार बचत
एलईडीचा करार 66 लाख 60 हजार 822 रुपयांप्रमाणे एकूण सात वर्षांसाठीचा असणार आहे. यामुळे प्रत्येक वर्षी नऊ लाख रुपये वीज बिल भरावे लागणार असून सात वर्ष कंपनी देखभाल व दुरूस्ती करणार आहे. शहरात वीज खांबाची संख्या एक हजार 500 आहे. सद्यस्थितीत सीएफएल व ट्यूबलाईट लावण्यात आले असून यामुळे महिन्याला वीज बिलात साडेतीन ते चार लाख रुपये वीज बिल येते तर वर्षाकाठी 50 लाख 40 हजार रुपये वीज बिल भरावे लागत होते मात्र आता खर्चात मोठी बचत होणार आहे.

जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांचा पुढाकार
वरणगाव नगरपालिकेच्या माध्यमातून मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने ईइएसएल कंपनीसोबत झाला आहे. यामुळे वरणगाव नगरपरीरषदेचे दोन कोटी 39 लाख 40 हजार रुपये या झालेल्या नवीन करारामुळे वाचणार आहेत. तसेच कामाला तत्काळ सुरवात करून दर्जेदार एलईडी बसवण्याचे आदेश याप्रसंगी जलसंपदामंत्री महाजन यांनी राज्याचे व्यस्थापकीय संचालक दीपक कोकाटे व अधिकार्‍यांना दिले.वरणगाव शहरात एक विकासाची मुहूर्तमेेढ रोवली असल्याचे नगराध्यक्ष सुनील काळे यांनी सांगितले.