वरणगावातील अक्सानगरात रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ

0

वरणगाव- शहरातील अक्सा नगरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. प्रभाग क्रमांक सातचे उपनगराध्यक्ष शेख अरवलाख यांनी नगरपरीषदेच्या माध्यमातून 46 लाख रुपये काँक्रिटीकरणाचे काम मंजूर केल्यानंतर रविवारी प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली. नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून कामाला सुरूवात करण्यात आली. अल्लाउद्दीन शेख भंगारवाले यांच्या दुकानापासून ते अक्सानगरातील इलेक्ट्रीक डिपीपर्यंत रस्त्याचे काम केले जात आहे.

यांची होती उपस्थिती
सामाजिक कार्यकर्ता मिलिंद मेढे, संजीव कोलते, ईरफान पिंजारी, साजीद कुरेशी, जावेद शेख, हकीम मामू , मोसीम खान, ईस्माईल बोदडे, वसीम शेख, युनीस खान सर , अलताब भाई, मेहबूब शहा, सिध्दीक रवान, फारुख शाह, उडान शाह, शाहरुख खान, फिरोज खान, अलीशेर खान, अनिल वंजारी, रमेश पालवे, ईलायत रवान आदी अक्सा नगरातील रहिवासी उपस्थित होते.