वरणगावातील अभियंता सोहिल कच्छी यांनी साकारले सॅनिटायजर मशीन

0

भुसावळ : तालुक्यातील वरणगाव येथील आडत धान्य व्यापारी हमीद सेठ कच्छी यांचा अभियंता असलेला मुलगा सोहिल हमीद कच्ची यांनी कोरोना महासंकटात सॅनिटायजर तसेच रेडिएशन स्वयंचलित इलेक्ट्रीक उपकरण बनवले आहे. त्यासाठी अवघा दोन हजार 500 रुपये खर्च आला आहे. या यंत्राचै वैशिष्ट्य म्हणजे यंत्रात हात ठेवल्यानंतर अ‍ॅटोमेटीक सेन्सर कार्यान्वीत होवून हातावर सॅनिटायजर पडते तर 30 सेकंदांपर्यंत ते हातावर चोळल्यानंतर दुसर्‍या रेडिशएन असलेल्या यंत्रात हात ठेवल्यानंतर त्यात हातावर असलेले किटाणू मरत पावतात, असा दावा करण्यात आला आहे. हे दौन्ही उपकरण शुक्रवारी नगरपरीषदेला सुपूर्द करण्यात आले. नगराध्यक्ष सुनील काळे व मुख्यधिकारी शामकुमार गोसावी यांना हे उपकरण सुपूर्द करण्यात आले. प्रसंगी अभियंता निशिकांत नागरे, गंभीर माळी, संजीव माळी, राजेंद्र गायकवाड, रवी धनगर, समाजसेवक ईरफानभाई पिंजारी उपस्थित होते. दरम्यान, या उपकरणामुळे विद्यार्थ्यांना चालना मिळणार असल्याचे कच्छी म्हणाले.