वरणगाव : नगरपालिकेच्या निवडणुकीत गटनेत्यांचा आदेश डावलणार्या खडसे गटातील पाच नगरसेवकांना जिल्हाधिकार्यांनी व्हीप उल्लंघणाची नोटीस बजावल्याने भाजपाच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. 15 जानेवारी रोजी या प्रकरणी सुनावणी होणार आहे. गटनेते सुनील काळे यांनी पालिकेच्या निवडणुकीत त्यांना मतदान करण्यासंदर्भात व्हीप जारी केला मात्र माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या गटातील पाच नगरसेवकांनी हा व्हीप धुडकावला होता. काळे यांनी उभयंतांना अपात्र करण्याबाबत याचिका दाखल केली होती व भाजपच्या रोहिणी जावळे, अरुणा इंगळे, विकीन भंगाळे, नितीन माळी, जागृती बढे या अपात्र करण्याबाबत याचिका दाखल केली होती.