वरणगाव- शहरातील जिल्हा परीषदेची कन्या व बॉईज मराठी शाळेची ईमारत ही जीर्ण व पडक्या अवस्थेत असून ईमारत केव्हा कोसळेल याचा भरवसा नाही शिवाय अपघात होवून अप्रिय घटना घडण्याची शक्यता अधिक असल्याने ही धोकेदायक इमारत पाडण्यात यावी, अशी मागणी वरणगावचे नगराध्यक्ष सुनील काळे यांनी जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा उज्वला पाटील, जिल्हा परीषदेचे उपाध्यक्ष नंदकुमार महाजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय म्हस्कर यांच्याकडे केली. प्रसंगी माजी सरपंच सुखलाल धनगर उपस्थित होते. जिल्हा परीषद उपाध्यक्ष नंदकुमार महाजन यांनी आगामी सभेत वरणगावचा विषय ठेवून योग्य ती दखल घेण्याचे प्रसंगी आश्वासन दिले. अतिरिक्त मुख्याधिकारी संजय म्हस्कर यांनादेखील कारवाईच्या सूचना त्यांनी केल्या.