वरणगावातील तलाठी कार्यालय बंद

0

शिवसैनिकांनी दरवाजाला वाहिली पुष्पमाला ; वर्षभरापासून नागरीकांचे दाखल्यांसाठी हाल

वरणगाव– स्थानिक तलाठी लाच घेताना पकडण्यात आल्यानंतर त्यांचे निलंबन करण्यात आले मात्र वर्षभरानंतरही तलाठ्यांची नियुक्ती न झाल्याने नागरीकांचे महसुली कामांचे हाल होत असल्यामुळे शिवसैनिकांनी जिल्हाध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी कार्यालयाच्या दरवाज्याला फुलहार घालुन निषेध व्यक्त केला. सेनेच्या या आंदोलनानंतर प्रशासनात खळबळ उडाली.

या शिवसैनिकांनी केले आंदोलन
गत वर्षी तलाठी यांच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ अटक केली होती तर त्यांना महसूल विभागाने निलंबित केले होते. त्यांच्या जागेवर महसुल विभागाने तात्पुरत्या प्रमाणात सहा महिन्यापर्यंत दररोज नवीन एक तलाठी कर्मचारी दिला मात्र गेल्या सहामहिन्यांपासून या ठिकाणी कुणीही तलाठ्याची नियुक्ती नसल्याने नागरीकांचे घरांचे, प्लॉट, बखळजागेसाठी तसेच शेतकर्‍यांना शेत उतारा महसुली शेतसारा, व विद्यार्थ्यांना दाखल्यांसाठी अडचणी येत आहेत. संप मिटल्यावरतरी तलाठी मिळेल, असे वाटत होते मात्र तसे न घडल्याने शिवसेनेने तलाठी कार्यालयाच्या दरवाजाला पुष्पहार घालुन निषेध व्यक्त केला. याप्रसंगी विलास मुळे, अबरार खान, रवी सुतार, डिगंबर चौधरी, शिवा भोई, सुपडू धनगर, हर्षल वंजारी उपस्थित होते.