वरणगावातील थंड पाण्याची यंत्रणा बंद

0

वरणगाव । गेल्या अनेक दिवसांपासून बसस्थानक चौकात बांधण्यात आलेल्या स्व. निखील एकनाथराव खडसे नामोलेख असलेल्या पाणपोईवर थंड पाण्याचे यंत्रबंद पडण्याने नागरिकांची व येणार्‍या जाणार्‍या प्रवाशांची गैरसोय होत असल्याने पालिकेने यंत्रणा दुरुस्त करण्याची राष्टवादी कॉग्रेस पक्षाचे नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी पालिकेचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

प्रवाशांच्या सोयीसाठी दुरुस्ती करावी
वरणगाव बसस्थानक चौकात स्वर्गीय निखील खडसे पाणपोई सुरू करण्यात आली होती. मध्यंतरीच्या काळात पाणपोईवरील थंड पाण्याचे यंत्रबंद पडल्याने नागरीक व प्रवाशांना थंड पाणी मिळत नाही. परंतू आता उन्हाळ्याचे दिवस सुरु असल्याने नागरीकांना पिण्यासाठी उपलब्ध होण्यासाठी सदरचे बंद पडलेले यंत्र दुरूस्थ करुण थंड पाण्याची व्यवस्था पालिकेचे नगराध्यक्षा अरुणा इंगळे व मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे नगरसेवक राजेंद्र चौधरी, गणेश चौधरी, रविंद्र सोनवणे, विष्णु खोले, प्रतिभा चौधरी यांनी मागणी केली आहे.