वरणगावातील दलित वस्तीचा होणार विकास 

0
प्रभाग 17 मध्ये विकासकामांसाठी 61 लक्ष रूपये मंजूर
वरणगाव:- शहरातील प्रभाग क्रमांक 17 मधील वामन गुरूजी नगरातील खुल्या जागेत क्लबहॉल व बगीचा विकसीत करण्याच्या कामासाठी शासनाने 61 लक्ष रुपयांचा निधी नगरपालिका दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत मंजूर केला आहे. जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी हा निधी मंजूर केला आहे.
निधीच्या  मागणीचा प्रस्ताव पालिकेचे नगराध्यक्ष सुनील  काळे, मुख्यधिकारी प्रशांत सरोदे  यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे पाठवला होता. त्यास प्रशासकीय मंजुरी जिल्हाधिकार्‍यांनी दिली आहे. प्रभाग क्रमांक 17 च्या नगरसेविका माला मिलिंद मेढे व कामगार नेते मिलिंद मेढे यांनी याबाबत नगराध्यक्षांकडे पाठपुरावा केला होता. खुल्या जागेत क्लब हॉल व बगीचासाठी निधी मंजूर झाल्याने वामन गुरुजी नगरातील नागरीकांमधून समाधान व्यक्त होत आहे. या कामाची वर्क ऑर्डर लवकरच निघणार असून लवकरच  भूमिपूजन सोहळा होईल, असे नगरसेविका माला मिलिंद मेढे म्हणाल्या.