वरणगावातील पाणीपुरवठा योजनेचे काम तातडीने पूर्ण करा*

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आढावा बैठकीत मुख्याधिकार्‍यांना दिली सुचना वरणगाव : प्रतिनिधी* वरणगांव शहरातील पाणी पुरवठा योजनेचे काम संथगतीने होत असल्याने शहरवासीयांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे . यामुळे योजनेचे काम तातडीने पूर्ण करा अशी सक्त सुचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कंत्राटदार व नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिली . वरणगावचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी वरणगाव पाणीपुरवठा योजनेचे काम संथतीने सुरू असल्याची तक्रार ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन आ .संजय सावकारे यांच्याकडे केली होती . त्या तक्रारीची दखल घेत ना गिरीष महाजन यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना तातडीने आढाव बैठक घेण्याच्या सूचना केली होती . त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी यांच्या दालनात जिल्हा प्रशासन अधिकारी जनार्दन पवार माजी नगराध्यक्ष सुनील काळे मुख्याधिकारी समीर शेख महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपकार्यकारी अभियंता श्री . लोखंडे, कंत्राटदार शहा यांच्यासह जिल्हा प्रशासनाचे सर्व अधिकारी उपस्थित होते . यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी काळे यांनी शहरात सद्यस्थितीत पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे हाल होत आहे . तर पाणी पुरवठा योजनेचे काम संथतीने सुरू राहिल्यास पिण्याचे पाणी हे एक महिन्यानंतर वरणगावकरांना मिळेल परिणामी लोक मोर्चे काढतील व आंदोलन करून आक्रोश व्यक्त करतील . त्याकरीता सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाला तातडीने सुरुवात करणे तसेच सांडपाणी प्रकल्प हा नव्याने शासनाकडे मंजुरीसाठी नगरपरिषदेने दाखल करावा अशी मागणी आढावा बैठकीत मांडली . त्यामुळे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा प्रशासन अधिकारी श्री .जनार्दन पवार यांनी सविस्तर आढावा घेऊन उन्हाळ्याच्या आत योजनेचे काम पूर्ण करावे असे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी बैठकीत दिले . *जलकुंभाच्या कामाला गती द्यावी* प्रतिभा नगर व विकास कॉलनी मधील जलकुंभाचे काम तसेच जॅकवेलच्या मोटारपंप बसविण्याच्या कामाला सुध्दा सुरवात करावी .व नगरपरिषदेने नवीन सांडपाणी प्रकल्पाचा प्रस्ताव तातडीने मंजुरीसाठी शासनाकडे पाठवा असे सूचना जिल्हाधिकारी यांनी मुख्याधिकारी समीर शेख यांना दिली . तसेच लवकरच पाणीपुरवठा योजनेच्या कामाची पाहणी करण्यासाठी मी वरणगावला येणार असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले