नेत्र रोगावरील रुग्णांच्या जळगावसह मुंबईत होणार शस्त्रक्रिया ; मोफत चष्मेही मिळणार
भुसावळ- तालुक्यातील वरणगाव येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचे खंदे समर्थक तथा वरणगावचे नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या पुढाकाराने सोमवारी महात्मा गांधी विद्यालयाच्या पटांगणावर महाआरोग्य शिबिर घेण्यात आले. आरोग्य दूत रामेश्वर नाईक यांच्याहस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. सकाळी आठ वाजेपासूनच महाआरोग्य शिबिराला सुरुवात झाली. आजूबाजूच्या 27 खेड्यातील जवळपास आठ हजार रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. दरम्यान, शस्त्रक्रिया करावयाच्या रुग्णांना जळगाव, मुंबई येथे नेण्यात येणार आहे तर नेत्रदोष असणार्यांना मोफत चष्मे वाटपदेखील होणार आहे.
यांची होती शिबिराला उपस्थिती
शिबिराचे उद्घाटन जळगाव जिल्ह्याचे आरोग्य दूत रामेश्वर नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयुध निर्माणी वरणगावचे महाप्रबंधक एस.चटर्जी, जिल्हा परीषदेचे उपाध्यक्ष नंदू महाजन, दीपनगर औष्णिक विद्युत प्रकल्पाचे उप अभियंता मोहन आव्हाड, नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाक शेख युसूफ, पालिकेचे नगरसेवक, शिबिर समन्वयक डॉ.मिलिंद निकुंभ, डॉ.अनंत शिनगारे, डॉ.रमेश जाधव, डॉ.गणेश चित्ते, डॉ.संजय चौधरी, डॉ.दशरथ वाणी, पितांबर भावसार, मुरली पाटील यांची होती उपस्थिती होती.
शिबिरात काटेकोर नियोजनाची प्रचिती
महात्मा गांधी विद्यालयाच्या दोन्ही पटांगणावर उभारलेल्या दंतरोग, स्त्री रोग निदान तसेच अस्थिरोग व नेत्र रोग कक्षात रुग्णांवर बाहेरून आलेल्या डॉक्टरांकडून निदान तसेच उपचार करण्यात आले. मुंबई, औरंगाबाद , जळगाव येथून आलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांना रणरणत्यात उन्हातही आपली सेवा चोखपणे बजावली. 300 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी याठिकाणी चोख नियोजन करीत रुग्णांना सहकार्य केले. परीसरातील आरोग्य सेवक, सेविका, आशा कर्मचारी, ग्रामीण रुग्णालय वरणगावचे वैद्यकीय, अधिकारी कर्मचारी व आजूबाजूच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्यांनीही शिबिरासाठी सहकार्य केले.
आठ हजारांवर रुग्णांची उपस्थिती
शिबिरात नेत्ररोगाच्या चार हजार 539, अस्थिरोगाच्या एक हजार 644, स्त्री रोग 452 तर दंतरोगाच्या एक हजार 626 मिळून एकूण आठ 261 रुग्णांची तपासणी करण्यात आली. दरम्यान, प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ तात्या लहाने हे स्वतः या शिबिराला उपस्थित राहून तपासणी करणार मात्र रविवारी सायंकाळी पाच वाजता त्यांना पितृशोक झाल्याने ते या शिबिराला उपस्थित राहू शकले नाहीत.
यांनी केली तपासणी
नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.सुजाता चहांदे, डॉ.वरूण दोशी, डॉ.राहुल कांबळी, डॉ.पूजा पाठक, डॉ.आशिका पाटील, डॉ.प्रसन्ना पाटील, डॉ.सुप्रिया पाटील, स्त्री रोग तज्ञ डॉ.प्रतिमा गायकवाड, डॉ.निशा झा, डॉ.प्रियंका केशरवणी, डॉ.कांचन चव्हाण, अस्थिरोग तज्ञ डॉ.चेतन शिंदे, डॉ.अमन, डॉ.अभिनव, डॉ.चिन्मय कोल्हे, डॉ.आसीफ शेख, दंतरोग तज्ञ डॉ.वहाब शेख, डॉ.जगदीशचंद्र वठार, डॉ.हर्षल बाफना, डॉ.वीपूर हांगे, डॉ.इम्रान पठाण, जन औषधी वैद्यकशास्त्र विभागाचे डॉ.विलास मालकर, डॉ.जितेंद्र सुरवाडे, डॉ.जाफर तडवी आदींनी रुग्ण तपासणी केली.