वरणगावातील वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी व भूमिगत योजनेसाठी 50 कोटी देणार

0

जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांची ग्वाही ; शहरात रस्ते कामांचा शुभार

वरणगाव- शहरातील रेल्वे स्टेशन ते बसस्थानक व नागेश्‍वर मंदीरादरम्यानच्या 50 लक्ष रुपये खर्चाच्या कामाचा शुभारंभ गुरुवारी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मोठ्या थाटात झाला. याप्रसंगी महाजन म्हणाले की, वरणगाव शहरासाठी 10 महिन्यात आपण 11 कोटींचा निधी मंजूर करून दिला आहे तर वाढीव पाणीपुरवठा योजना व भूमिगत गटारीसाठी 50 कोटी रुपये मिळवून देण्याची ग्वाहीदेखील त्यांनी दिली.

यांची होती उपस्थिती
खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाक, मुख्यधिकारी शिल्पा दरेकर, नगरसेवक माला मेढे, अरुणाबाई इंगळे, शशी कोलते, म्हेनाजबी बी.इरफान पिंजारी, नसरीनबी साजीद कुरेशी, प्रतिभा चौधरी, रोहिणी जावळे, जागृती बढे, नगरसेवक राजेंद्र चौधरी, रवींद्र सोनवणे, गणेश चौधरी, विष्णू खोले, नितीन माळी, मिलिंद मेढे, इरफान पिंजारी, संजय कोलते, साजीद कुरेशी, तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक नगराध्यक्ष सुनील काळे यांनी केले.

विकासकामांसाठी एकत्र या -महाजन
विकासकामे करताना सर्वांनी एकत्र रहा, असे आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी केले. कर्मचारी आकृती बंधात शंभर टक्के समायोजन कसे करता येईल त्याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलून चांगला निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली. वरणगाव शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिली.

विविध योजनांची केली पाहणी
मंत्री महाजन यांनी गुरुवारी हतनूर धरणावरील उपसा जलसिंचन प्रकल्प, काहूरखेडा तलाव व ओझरखेडा येथील तलावाची पाहणी केली. यावेळी त्यांनी तिघाही ठिकाणाची सविस्तर माहिती अधिकार्‍यांकडून जाणून घेतली. यावेळी टहाकळी येथील सरपंच प्रमोद चौधरी यांनी उपसा जलसिंचन प्रकल्प अर्धवट राहिलेला मार्ग टाकळी गावापर्यंत पूर्ण करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन दिले. तसेच ओझरखेडा येथील तलावाची पाहणी करत असताना या तलावात भूसंपादन झालेल्या शेतकर्‍यांनी दीपनगर प्रकल्पात आमच्या मुलांना नोकरीवर लावून देण्यात यावे, अशी मागणी केली.

यांची होती उपस्थिती
कार्यक्रमास गंभीर माळी, संजय माळी, राजू गायकवाड, मेघराज चौधरी पाणीपुरवठा अभियंता गणेश चाटे, नामदेव पहेलवान, ज्ञानेश्‍वर घाटोळे, माजी सरपंच सुखलाल धनगर, अलाद्दीन सेठ, डी.के.खाटीक, सचिन मेथळकर, सोनू कुरेशी, हितेश चौधरी, कुंदन माळी, तेजस जैन संजयकुमार जैन यांच्यासह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.