अतिक्रमण व थकबाकी भोवली : जिल्हाधिकार्यांच्या कारवाईने खळबळ
जळगाव : भुसावळ तालुक्यातील वरणगाव पालिकेतील शिवसेनेच्या नगरसेविका शशी संजय कोलते यांना अतिक्रमण व पालिकेची थकबाकी न भरल्याने जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी अपात्र केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या संदर्भात महेश सुपडू सोनवणे व कोमलजीत हरजीतसिंग आनंद यांनी जिल्हाधिकार्यांकडे तक्रार केली होती.
नगरसेविकेवर कारवाईची ‘संक्रांत’
नगरसेविका शशी कोलते यांनी गट क्रमांक 861 मधील प्लॉट क्रमांक 28 मध्ये अतिक्रमण करून पक्के बांधकाम केले शिवाय पालिकेच्या30 लाख 37 हजार 705 रुपये थकबाकीतील दोन लाख 17 हजार 577 रुपयांची थकबाकी भरलेली नव्हती शिवाय गट क्रमांक 481 मधील ओपन स्पेसवर गेट टाकून अतिक्रमण केल्याची तक्रार जिल्हाधिकार्यांकडे करण्यात आली होती. याप्रकरणी वरणगाव मुख्याधिकार्यांनी चौकशी अहवालात थकबाकी असल्याचे व अतिक्रमण केल्याचा खुलासा पाठवल्यानंतर मकरसंक्रांतीच्या दिवशी कोलते यांना अपात्र करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील विधी अधिकारी अॅड.हरूल देवरे यांनी दिली.