भुसावळ- तालुक्यातील वरणगाव येथील शिवाजी नगरातील रहिवासी विनोद पवार आपल्या बाहेरगावी गेल्याची चोरट्यांनी संधी साधत घरातील सामानाची नासधूस करी करीत दोन मोबाई लांबवल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. विनोद पवार यांच्या माहितीनुसार, ते गेल्या काही दिवसापासून गावी गेल्याने घराला कुलूप होते. चोरट्यांनी घराचे कुलूप घरातील कपाट, कोठी आदी वस्तूंची नासधूस केली तसेच दोन मोबाई लांबवण्यात आली. पवार यांच्या शेजारी राहत असलेले वरणगाव पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक निलेश वाघ हे रात्रीची ग्रस्त करून घरी गेल्यानंतर त्यांना शेजारी बंद असलेल्या घरात आवाज आल्याने त्यांनी धाव घेताच चोरटे पळाले.