वरणगाव:- शहरात मजूर नागरीकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून काही महिन्यांपूर्वी रेशनकार्डावर धान्य दिले जाते मात्र मात्र गेल्या काही दिवसांपासून दुकानदारांनी मनमानी करीत स्वस्त धान्याचे वाटप थांबवल्याने लाभार्थींची गैरसोय होत आहे. या संदर्भात वरणगावचे नगराध्यक्ष सुनील काळे यांनी अन्न व पुरवठा नागरी मंत्री गिरीश बापट यांच्याकडे तक्रार केली आहे.
वरणगाव शहरात सिद्धेश्वर नगरासह असंख्य नागरीक मजुरी व्यवसाय करतात तर त्यांना अंत्योदय योजनेतून केशरी रेशनकार्ड धारकांना धान्य पूर्वी भेटत होते मात्र रेशन दुकानदारांनी गेल्या काही दिवसांपासून धान्य देणे बंद केल्याने मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. नवीन रेशन कार्ड देण्याचीही मागणी काळे यांनी बापट यांच्याकडे केली. या संदर्भात दखल घेण्याचे आश्वासन बापट यांनी दिले.