वरणगावातून जाणार्‍या रस्त्याचे चौपदरीकरण हवे

0

नगराध्यक्ष सुनील काळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना घातले साकडे

वरणगाव- वरणगाव शहरातून जाणार्‍या रेल्वे स्टेशन ते कठोरा रस्त्याचे चौपदरीकरण करण्याची मागणी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंत्यांकडे मागणी केली आहे. यामध्ये वरणगाव शहरातून जाणार्‍या रेल्वे स्टेशन ते रावजीबुवा कठोरा रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. या रस्त्यावर शाळा, दवाखाने, रेल्वे स्टेशन, बाजारपेठ असताना अवजड वाहनांमुळे छोटे-मोठे अपघात होतात. दुर्घटना टाळण्यासाठी शहरातून जाणार्‍या रस्त्याचे चौपदरीकरण करून रूंदीकरण दुभाजक, गटारी व स्ट्रिट लाईट अंदाजे 3.50 कि.मी. लांबीचा रस्ता तयार करावा, अशी मागणी करण्यात आली. रस्ता रुंदीकरण करणे कामी आवश्यक असलेली जागा वरणगाव नगरपरीषद देण्यास तयार असल्याचेही काळे यांनी सांगितले.