वरणगाव- शहरातील बसस्थानक चौकातील नगरपालिका हॉलमध्ये कैकाडी समाजाचा मेळावा रविवार, 13 रोजी सकाळी 11 वाजता होत आहे. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य कैकाडी समाज संघर्ष समितीचे अध्यक्ष एस.एल.गायकवाड असतील. प्रसंगी कार्याध्यक्ष नारायण गायकवाड, सदस्य रोहिदास अण्णा जाधव, अॅड.शिरीषकुमार जाधव, प्रा.स्वरूपचंद गायकवाड, राजेंद्र गायकवाड आदींची उपस्थिती राहणार आहे. उपस्थितीचे आवाहन संयोजक रवींद्र गायकवाड, दिलीप गायकवाड, किरण भुसांडे, रवी गायकवाड, राजू गायकवाड, सुनील भुसांडे, प्रकाश जाधव, वाल्मिकी जाधव, विनोद गायकवाड, अंकुश गायकवाड, दीपक जाधव, रोहन भुसांडे, अजय जाधव, प्रकाश गायकवाड, मधुकर जाधव, सुरेश देवगिरे, गजानन देवगिरे, तुषार जाधव, सचिन जाधव, मनोज जाधव, अविनाश जाधव, ऋषी भुसांडे, ओम गायकवाड, प्रथमेश जाधव व सर्व कैकाडी समाजबांधवांनी केले आहे.