वरणगावात एकावर विळ्याने प्राणघातक हल्ला

0

वरणगाव । येथील मोठा माळी वाड्यातील रहिवाशी अविनाश बळीराम माळी (वय 34) यांच्यावर एका माथे फिरुने खांद्यावर विळ्याने वार करुण जबर दुखापत केल्याची घटना मंगळवार 21 रोजी घडली. याप्रकरणी जखमीला खाजगी रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले आहे.

जखमीला उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल
शहरातील नाथ शाळेच्या पटागंना शेजारी एका समाज मंदीरात राहत असलेल्या भटक्या उतारकरु हा त्याच्या पत्नीला दारुच्या नशेत मारहाण करीत होता. हे लक्षात आले असता त्यांचे भांडण सोडविण्यासाठी अविनाश माळी गेला असता त्याचा राग येवुन माळी यांच्या मागून जावुन डाव्या खांद्यावर विळ्याने वार करुन जबर जखमी केले जखमीला डॉ. भोईटे यांच्या रुग्णालयात प्रथम उपचार करुन भुसावळ येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

वरणगाव पोलीसात गुन्हा दाखल
संशियत आरोपी गावडे याने जखमी माळी याला विळ्याने वार केल्याच्या कारणास्तव नागरीकांच्या जमावाने बेदम मारहाण केल्याने दुखापत झाली. त्याला वरणगांव ग्रामिण रुग्नालयात प्राथमिक उपचार करुन जळगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेविषयी जखमी अविनाश माळी यांच्या फिर्यादी वरुन वरणगांव पोलीसात संशयीत आरोपी निना रामदास गावडे (वय 35) यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असुन वरणगांव पोलीस तपास करीत आहे.