भुसावळ- तालुक्यातील वरणगाव फॅक्टरी वसाहतीतील गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह आरोपीस वरणगाव पोलिसांनी अटक केल्याने खळबळ उडाली आहे. विकास ऊर्फ विक्की प्रकाश ढिके (21, क्वॉटर नंबर 69 / टाईप टू) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. वरणगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदिप बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नरसिंग चव्हाण व अतुल बोदडे यांनी आरोपीला अटक केली. आरोपी डीएससी चौक ते साईगेट दरम्यान रस्त्यावर असताना त्याच्या चौकशीनंतर 15 हजार रुपये किंमतीची गावठी बनावटीचे पिस्टल तसेच शंभर रुपये किंमतीचे एक काडतुस जप्त करण्यात आले. अतुल बोदडे यांच्या फिर्यादीनुसार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.