वरणगावात चोरी : माजी सरपंच पूत्र जाळ्यात

0

वरणगाव : शहरात गत दोन महिन्यांपूर्वी भोई वाड्यात 9 ऑक्टोबर रोजी अडीच लाखांची चोरी झाली होती. या प्रकरणी मंगळवारी रात्री माजी सरपंच सुभाष वाघ यांचा मुलगा संकेत यास वरणगाव पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीच्या ताब्यातून चोरीस गेलेला ओप्पो कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. शेख समीर शेख सलीम (भोईवाडा, वरणगाव) यांचे कुटूंब रात्रीच्या वेळी घराचा दरवाजा उघडा ठेवून झोपलेले असतांना आरोपी संकेत सुभाष धनगर (वाघ) यांने घरात अनधिकृत प्रवेश करून घरातील कपाटातील पैसे व दागिने तसेच घरातील बेडवर ठेवलेला ओप्पो कंपनीचा मोबाईल लांबवला. वरणगाव पोलिस गुन्ह्याचा तपास करीत असताना संशयीत आरोपी संकेत सुभाष धनगर (वाघ) याबाबत माहिती मिळाल्यावरू त्यास बुधवारी अटक करण्यात आली. पोलिस चौकशीत आरोपनीन गुन्ह्याची कबुली देत ओप्पो कंपनीचा मोबाईल काढून दिला. आरोपीला न्यायालयाने एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. गुरुवारी पुन्हा आरोपीला न्यायालयात हजर केले जाणार आहे. तपास हवालदार सुनील वाणी करीत आहेत.