वरणगावात झाली कुंदकेश्वर महादेवाची स्थापना

सवाद्य मिरवणूकीने शिवपिंडीची महालक्ष्मी नगरात स्थापना 

वरणगांव : प्रतिनिधी

शहरातील महालक्ष्मी नगर येथे श्रावण महीन्यातील अखेरच्या सोमवारी श्री कुंदकेश्वर महादेव शिवपिंडची स्थापना करण्यात आली . तत्पूर्वी शिवपिंडीची शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली .

 

शहरातील फुलगांव मार्गावर असलेल्या महालक्ष्मी नगर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या मंदिरात ओंकारेश्वर येथून आणलेल्या श्री . कुंदकेश्वर महादेव शिवपिंडीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली . तत्पूर्वी सजवलेल्या बैलगाडीतुन शिवपिंडीची शहरातुन वारकरी व ढोलताश्यांच्या गजरात सवाद्य मिरवणूक काढण्यात आली . शिवपिंडीची प्राणप्रतिष्ठा व कळस पूजन समाधान महाजन सर ( शिवसेना जिल्हा प्रमुख ) यांचे हस्ते करण्यात आले . यावेळी महालक्ष्मी नगर व परिसरातील भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती .