वरणगाव । येथील मकरंद नगरमधील रहिवाशी रामकिसन कश्यप यांच्या बंद घराचे कुलूप तोडून सोन्याचे, चांदीचे दागीने व रोख रक्कम अस एकुण दिड लाखाचा ऐवज लांबविल्याची घटना 23 रोजी उघडकीस आल्याने अज्ञात चोरट्यांविरूध्द वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामकिसन कश्यप (वय 70, राहणार मकरंदनगर) हे नाशिक येथे मुलाकडे गेल्या 5 दिवसांपासून घराला कुलूप लावून गेले होते.
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास
22 रोजीच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करून गोदरेजचे कपाट व तिजोरीचे लॉक तोडून कपाटातील चोरी झालेला ऐवज सोन्याचे मंगळसूत्र, गळ्यातील हार, अंगठी, सोन्याचा मांग टिका तसेच चांदीचा कमरपट्टा, नाकातील नथ, पायल, जोडवे व रोकड 55 हजार असे एकुण दिड लाखाचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लांबविला आहे. अनिता शाममोहन पवार (वय 37) हिच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास पीएसआय रफीक पठाण, हेडकॉन्स्टेबल मजहर पठाण करीत आहे.