वरणगावात दोन कोटी 57 लाखांचे शौचालय मंजूर

0

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पाठपुराव्याला यश

भुसावळ- स्वच्छ अभियानांतर्गत तालुक्यातील वरणगाव येथे सार्वजनिक शौचालयासाठी जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी दोन कोटी 57 लाख रुपये किमतीचे सार्वजनिक शौचालयाला मंजुरी दिली आहे. या कामासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी शिफारस केल्याचे नगराध्यक्ष सुनील काळे म्हणाले. नगराध्यक्ष म्हणाले की, वरणगाव शहरात स्वच्छ अभियानांतर्गत काही भागांमध्ये सार्वजनिक शौचालयाची आवश्यकता होती यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पत्र देऊन निधीची मागणी केली होती. त्यानुसार जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकार्‍यांना पत्र दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकार्‍यांनी पाच प्रभागांमध्ये सार्वजनिक शौचालय तयार करण्याच्या कामाला प्रशासकीय मान्यता दिल्याने शहर हगणदरीमुक्त होणार आहे शिवाय आधुनिक पद्धत्तीने शौचालय बांधले जाणार असल्याने महिलांची कुचंबणा थांबेल, असेही नगराध्यक्ष म्हणाले.