वरणगाव : वरणगाव पालिकेने प्रसिद्धी केलेल्या प्रारुप मतदार याद्यांमध्ये प्रचंड अनागोंदी झाली असून या प्रकाराने शिवसेना पदाधिकारी आक्रमक झाले असून त्यांनी न्यायालयातही जाण्याचा दिला इशारा दिला आहे. सोमवारी हरकती व आक्षेप घेण्याचा अखेरचा दिवस असल्याने तक्रारी आणि आक्षेपांचा पाऊसच पडला .शिवसेनेच्यावतीने नगरपालिकेत शिष्टमंडळ जाऊन धडकले. रीतसर लेखी स्वरुपात पुराव्यांचा हरकती आणि तक्रारी दाखल करण्यात आल्या करण्यात आल्या. पूर्वी एक हजार 340 हरकती दाखल झालेल्या होत्या आणि आज सुमारे एक हजारांच्या आसपास तक्रारी प्राप्त झाल्या. या तक्रारींचे निरसन करून याद्या अद्ययावत न केल्यास वेळप्रसंगी औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये जाण्याचा खणखणीत इशारा शिवसेनेच्या वतीने तालुकाप्रमुख समाधान महाजन व सर्व पदाधिकार्यांनी नगरपालिकेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यवंशी व इतर अधिकार्यांना दिला आहे.
मतदारयाद्यांमध्ये प्रचंड घोळ
15 फेब्रुवारी 2019 रोजी नगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप यादीत प्रचंड घोळ असून नियमबाह्य पद्धतीने बेकायदेशीर नाव समाविष्ट करण्यात आली आहेत. मतदार प्रत्यक्षात ज्या ठिकाणी रहिवासाचा आहे तिथे त्याची नाव नोंदणी अपेक्षित आहे परंतु असे न करता त्यांची नोंदणी इतर प्रभागांमध्ये करण्यात आली आहे. काही मतदार वरणगाव शहरात राहत नसून देखील बनावट आणि खोट्या कागदपत्रांच्या आधारे राजकीय हेतूने काही नगरपालिकेच्या अधिकार्यांना हाताशी धरून राजकारण्यांनी याद्यांमध्ये प्रचंड घोळ घालण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असून या याद्या नियमाप्रमाणे बिनचूक करून लोकशाही मार्गाने निवडणुका पार पाडाव्या, अशी अपेक्षा शिवसेनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली. दुरुस्ती न केल्यास शिवसेना आपल्या पद्धतीने पाठपुरावा करेल हेदेखील पदाधिकार्यांनी निक्षून सांगितले.
यांची होती उपस्थिती
या शिष्टमंडळात रावेर लोकसभा मतदारसंघाचे उपजिल्हा संघटक विलास मुळे, उपजिल्हा प्रमुख प्रा.उत्तम सुरवाडे, तालुकाप्रमुख समाधान महाजन, निळू सरोदे, सुभाष चौधरी, सईद मुल्ला, सागर वंजारी, राहुल बावणे, सुरेश चौधरी आदी उपस्थित होते.