वरणगावात बंद पडलेल्या हातपंपाचे झाले वर्षश्राद्ध

प्रतिभा नगर मधील हातपंप वर्षभरापासुन आहे बंदावस्थेत

वरणगांव | प्रतिनिधी
वरणगांव शहराच्या प्रतिभा नगर मधील हातपंप वर्षभरापासून बंदावस्थेत आहे . यामुळे या भागातील लोकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असुन सोमवारी त्रस्त झालेल्या नागरीकांनी या हातपंपाचे वर्षश्राद्ध करून नगर परिषदेकडे हातपंप दुरुस्तीची मागणी केली .
शहराच्या प्रतिभा नगर मधील उर्दू हायस्कुल जवळ नगर परिषदेच्या माध्यमातुन हातपंप बसवण्यात आला आहे . या हातपंपाच्या पाण्याचा नागरीकांना टंचाईच्या काळात दिलासा मिळतो . मात्र, हा हातपंप वर्षभरापासून दुरुस्ती अभावी बंदावस्थेत पडला असून पाणी टंचाईच्या काळात नागरीकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो . याबाबत नगर परिषद प्रशासनाकडे वारंवार हातपंप दुरुस्तीची मागणी करण्यात आली . मात्र, नगर परिषद प्रशासनाकडून चाल ढकल केली जात असल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी सोमवारी बंदावस्थेत असलेल्या या हातपंपाचे पुजन करून वर्षश्राद्ध केले . तसेच हा हातपंप त्वरीत दुरुस्त करण्यात यावा अन्यथा नगर परिषदेवर हंडा मोर्चा काढण्यात येईल असे सांगितले .
*????????पाणी पुरवठा होतो विस्कळीत*
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेत वारंवार तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत होतो . अशा वेळी प्रतिभा नगर मधील हा ऐकमेव हातपंप नागरीकांना दिलासादायक ठरतो . मात्र, हातपंपच बंद असल्याने नागरीकांच्या अडचणीत भर पडते .
*????????यांची होती उपस्थिती*
नादुरुस्त हातपंपाच्या वर्षश्राद्ध कार्यक्रम वेळी संतोष इंगळे, भैय्या सोनवणे, किशोर कोळी, गयाबाई कोळी, बाळुभाऊ सोनवणे, पुष्पा वाघ, आरती वाघ, शोभाबाई कोळी, वेदांत वाघ, विजय वाघ यांचेसह इतरांची उपस्थिती होती .