वरणगावात भीमसैनिकांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा

0
वरणगाव : भीमा-कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ भीम सैनिकांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. हल्ला करणार्‍यांवर कठोर कारवाई तसेच या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.
बुधवारी सकाळी 10 वाजता डॉ.आंबेडकर नगरापासून वरणगावसह परीसरातील भीमसैनिकांचा मोर्चा पोलीस ठाण्यावर धडकला. युवक-युवती तसेच समाजबांधव हजारोंच्या संख्येने सहभागी झाले. सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी यांनी निवेदन स्विकारले.