वरणगावात मंजूर योजनेचे काम सुरू करण्यासाठी महिलांचे ‘ठिय्या आंदोलन’
वरणगाव मंजूर पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी महिलादिनी रणरागिणी आक्रमक
वरणगाव : वरणगाव शहरासाठी मंजूर असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाला सुरूवात करावी, या मागणीसाठी महिलादिनी रणरागिणींनी आक्रमक होत पालिकेच्या प्रांगणात ठिय्या मांडत जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनकर्त्यांनी मुख्याधिकारी सौरभ जोशी यांना मागण्यांचे निवेदन हंड्यावर लावून हंडा भेट दिला. तत्काळ भाजपा सरकारच्या काळात मंजूर असलेल्या पाणी योजनेचे काम सुरू करा अन्यथा आंदोलन तीव्र करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. दरम्यान, एका महिन्यांच्या आत मंजूर पाणी योजनेच्या कामाला सुरुवात करण्यात येईल, असे ठोस आश्वास मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी दिले.
निवेदनात या मागण्यांचा समावेश
वरणगाव शहरासाठी मंजूर असलेल्या पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करावे तसेच दोन कोटी 72 लक्ष रुपये मंजूर असलेल्या नागेश्वर मंदिराचे काम सुरू करावे, जगदंबानगर, मकरंद नगर येथील उद्यानाच कामाला सुरुवात करावी, भोगावती नदी सुशोभीकरणासाठी पाच कोटी राखीव ठेवला असून त्या कामाला सुरुवात करावी, पिसाळलेल्या कुत्र्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा, सिद्देश्वर व अक्सा नगरातील शौचालय सुरू करावे, कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी फवारणी करावी आदी मागण्या करण्यात आल्या.
यांचा आंदोलनात सहभाग
यावेळी भाजपा महिला मोर्चा शहराध्यक्ष प्रणिता पाटील-चौधरी, माजी नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाख, भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी, शामराव धनगर, जिल्हा उपाध्यक्ष अॅड.ए.जी.जंजाळे, कृष्णा माळी, संदीप माळी, पप्पू ठाकरे, मिलिंद भैसे, गणेश चौधरी, महिला रजनी भावसार, रुपाली काळे, संगीता सुनील माळी, पूजा शामराव धनगर, तायडे, जयश्री अवतारे, उषा तावडे, संगीता माळी, भाग्यश्री पाटील, मंदा शेळके, चंद्रकला वारूळकर, वर्षा बढे, रेखा तायडे, विद्या तायडे, रूपाली लोंढे, बेबी माळी, मंगला तेली, प्रमिला बडगुजर, तुळसाबाई वंजारी, भारती माळी, विमीक्षा बेन पटेल, सुशीला महाजन, मंगला महाजन आदींसह महिलांची उपस्थिती होती.