वरणगावात मालगाडीच्या कोळशाला लागली आग

0

वरणगाव- वरणगाव रेल्वे स्थानकावर आऊट लाईनवरील कोळसा वाहून नेणार्‍या मालगाडीच्या डब्याला अचानक आग लागल्याची घटना शनिवार, 11 शनिवार रोजी पहाटे 6.35 वाजेच्या सुमारास घडली. आगीची माहिती रेल्वे कर्मचार्‍याच्या लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. आचेगाव रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे कर्मचारी अनिल व किशोर हे नागपूरकडून वरणगावकडे कोळसा वाहून नेणारी मालगाडी आणत असताना पहाटेच्या सुमारास कोळशाला आग लागल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी वरणगाव रेल्वे स्टेशनवर याबाबत कळवताच स्टेशन मास्तर यांनी आऊटवर गाडी थांबविली. स्टेशन मास्तर यांनी वरीष्ठ अधिकार्‍यांच्या माहितीनुसार वरणगाव आयुध निर्माणीतील अग्निशमन दलाला पाचारण केल्यानंतर तातडीने पाण्याचा मारा करताच आगीवर नियंत्रण मिळाले. आगीची प्रमाण वाढू नये म्हणून वीजपुरवठा बंद करण्यात आला.

यांनी विझविली आग
वरणगाव आयुध निर्माणी अग्निशमन दलाचे कर्मचारी व्ही.बी.कांबळे, जे.पी.पाटील, एस.आर.आचारे, ए.व्ही.देशमुख, सी.के.गवळी, एम.डी.सोनवणे, आर.पी.सोनार, एस.जी.जयस्वाल, पी.एस.कुळकर्णी, जे.के.अहिरराव, रेल्वे कर्मचारी विभाग स्टेशन मास्तर एस.एन.शेगोकार, एस.एम.विवेकानंद, दीपककुमार मंडल, हरीचंद वंसन, दिलीप झोपे, रेल्वे चालक एम.पी.कुळकर्णी, गार्ड आर.पी.सिंग आदींनी सहकार्य केले.