वरणगावात रस्ता कामासाठी भाजपाचे ‘खड्डा पूजन’ आंदोलन

वरणगाव बसस्थानक ते रेल्वे स्टेशन रस्त्याचे काम करण्याची अपेक्षा

वरणगाव : वरणगाव बसस्थानक ते रेल्वे स्टेशन रस्त्याचे काम करण्याच्या मागणीसाठी भाजपा पदाधिकार्‍यांनी रविवारी सरकारचा निषेध करून पडलेल्या खड्ड्याचे पूजन केले. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चालढकल धोरणाचा निषेध यावेळी करण्यात आला.

खराब रस्त्यामुळे अपघाताची भीती
वरणगाव बसस्थानक ते रेल्वे स्टेशन रस्त्याचे काम करण्याची अपेक्षासार्वजनिक बांधकाम विभागाला माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी वेळोवेळी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत रस्त्याचे काम अर्धवट असल्यामुळे खराब रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी केली होती. खराब रस्त्यामुळे अपघात होण्याची भीती असून शासनाने दखल घेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

भाजपाने केले खड्ड्यांचे पूजन
रस्त्याचे काम सुरू होण्यासाठी भाजपातर्फे खड्डे पूजन करण्यात आले. भाजपा महिला मोर्चाचे शहराध्यक्ष प्रणिता पाटील चौधरी यांच्या हस्ते नारळ व विधीवत पूजा करून निषेध करण्यात आला. ‘बांधकाम मंत्री करता काय? खाली डोके वरती पाय’, ‘आघाडी सरकार मुर्दाबाद’च्या घोषणांनी शहर दणाणून गेले . यावेळी रस्त्याच्या कामाला सुरुवात न केल्यास जनतेच्या हितासाठी भाजपा आक्रमक आंदोलन करेल, अशा इशारा माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी दिला. प्रसंगी नगरसेविका माला मेढे, शहराध्यक्ष सुनील माळी, ज्येष्ठ नेते हाजी अल्लाउद्दीन सेठ, शहर सरचिटणीस गोलू राणे, कुंदन माळी, शहर उपाध्यक्ष हितेश चौधरी, युसुफ खान, शामराव धनगर, मनोहर सराफ, माजी सरपंच सुभाष धनगर, भाजयुमो शहराध्यक्ष संदीप भोई, तेजस जैन, मिलिंद भैसे, भाऊलाल टिंटोरे, डॉ.प्रवीण चांदणे, पप्पू ठाकरे, आकाश निमकर, गजानन वंजारी, पप्पू ठाकरे, छोटू सेवातकर, योगेश वंजारी, गंभीर माळी, विवेक कुलकर्णी, अंकुश साबळे, जिगर पालवे, जयेश कपाटे, कमलाकर मराठे यांच्यासह असंख्य भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. रस्त्याच्या कामाला त्वरीत सुरवात करण्याचे आश्वासन मुख्य अभियंता प्रशांत सोनवणे यांनी दिले. निवेदनाची प्रत आमदार संजय सावकारे व खासदार रक्षा खडसे यांना देण्यात आली.