वरणगावात वराहांवर विष प्रयोग, 15 वराहांचा मृत्यु

0

पिठात थायमेटचा वापर केल्याचे आले आढळुन : मालकाचे 45 हजार रूपयाचे नुकसान

भुसावळ- वरणगाव शहरात शनिवारी रात्री अज्ञाताने पिठात थायमेट या विषारी द्रव्याचा वापर करून वराहांना खावू घातल्याने 15 वराहचा मृत्यु झाल्याचे रविवारी सकाळी उघडकीस आले. यामुळे वराह मालकाचे किमान 45 हजार रूपयाचे नुकसान झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. वरणगाव शहरातील रहीवाशी आकाश विनोद उजलेकर यांनी 15 वराह पालन केले होते.मात्र शहरात मोकाट फिरणार्‍या या वराहांना शनिवारी रात्री थायमेट हे विषारी द्रव्य पिठात घालून खावू घालण्यात आले. यामूळे मध्यरात्री प्रतिभा नगरच्या पुलावर व नाल्यात या वराहंचा मृत्यु झाल्याचे सकाळी दिसून आले. यामध्ये पशुमालकाचे किमान 45 हजार रूपयाचे नुकसान झाले आहे.मृत्यु झालेल्या एका मोठ्या वराहची किमंत सहा हजार तर लहान वराहची किमंत किमान तिन ते चार हजार रूपये असल्याचे वराह पालक आकाश उजलेकर यांनी सांगितले. वराहांवर विष प्रयोग करून त्यांना ठार करण्यात आलेल्या घटनेमूळे अज्ञाता विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.