वरणगावात विवाहितेला ठार मारण्याची धमकी

0

वरणगाव- शहरातील त्र्यंबकेश्‍वर नगरातील रहिवासी असलेल्या विवाहिता सुनंदा विनोद महाजन (34, त्र्यंबकेश्‍वर नगर, वरणगाव) यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी वरणगाव पोलिसात संशयीत आरोपी भानुदास रामचंद्र ससाणे (35, हातखेडा, ता.शेगाव, जि.बुलढाणा) विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. बुधवारी पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास सुनंदा या किचनमध्ये लहान मुलांसाठी चहा बनवत असताना आरोपी लोखंडी सळई घेवून किचनमध्ये शिरला व आवाज नाही करायचा तर आरडा-ओरड केल्यास जीवे ठार मारेल, अशी धमकी त्याने दिली.