वरणगावात शेतकरी विरोधी काळ्या कायद्यांचा निषेध : पोलीस प्रशासनाला राष्ट्रवादीचे निवेदन

वरणगाव : शेतकरी विरोधी काळे कृषी कायदे रद्द करावे या मागणीसाठी सोमवारी भारत बंदची हाक देण्यात आली होती. भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भुसावळ तालुका व वरणगाव शहराच्या वतीने जाहीर पाठिंबा दर्शवून वरणगावात पोलीस प्रशासनाला मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले. दरम्यान, कोरोना महामारीमुळे आधीच व्यापारी संकटात असल्याने वरणगाव शहर बंद न ठेवता सोमवारी सकाळी 11 वाजता भारत बंदला पाठिंबा देऊन केंद्र सरकारपर्यंत आपल्या मागण्या पोहोचवण्यासाठी वरणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशीष आडसुळ यांना निवेदन देण्यात आले.

महागाईमुळे सर्वसामान्य हतबल
दैनंदिन जीवनात पेट्रोल, डिझेलसह गॅस दरवाढीमुळे सामान्य माणूस हतबल झाला आहे. गॅस दरवाढीमुळे तर महिला भगिनी यांना एक वेळेस चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. उज्वला योजनेचा महिलांना काय फायदा…? तरुणांच्या हाताला काम नाही त्यातच कामगारांना तसेच शेतकर्‍यांना बरबाद करणारे कायदे सध्या केंद्र सरकार करत आहे. यावर केंद्र सरकारने विचार करायची गरज आहे, असे प्रतिपादन जळगाव जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी यांनी केले. झोपेचं सोंग घेतलेल्या या दळभद्री केंद्र सरकारला जाग केव्हा येईल..? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी जळगाव जिल्हा उपाध्यक्ष वाय.आर.पाटील यांनी उपस्थित केला.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी, युवक जिल्हा उपाध्यक्ष वाय.आर.पाटील, महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष प्रतिभा तावडे, भुसावळ तालुकाध्यक्ष दीपक मराठे, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष पप्पू जकातदार, तालुका उपाध्यक्ष प्रकाश नारखेडे, मनोज अग्रवाल, वरणगाव महिला आघाडी शहराध्यक्ष रंजना पाटील, माजी नगराध्यक्षा अरुणा इंगळे, माजी नगरसेविका रोहिणी जावळे, संगीता राजेंद्र चौधरी, श्रद्धा दिलीप गायकवाड, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष मनोज कोलते, मागासवर्गीय सेल तालुकाध्यक्ष जयराज पवार, पदवीधर संघ तालुकाध्यक्ष प्रा.भागवत पाटील, तालुका सरचिटणीस राजेश चौधरी, ओबीसी सेल तालुका उपाध्यक्ष उल्हास पाटील, ओबीसी सेल कार्याध्यक्ष मिलिंद महाजन, शहर उपाध्यक्ष कैलास माळी, माजी नगरसेवक सुधाकर जावळे, ज्येष्ठ नगरसेवक विष्णू खोले, माजी नगरसेवक रवी सोनवणे, माजी नगरसेवक बबलू माळी, इफ्तेखार मिर्झा, शांताराम सुरळकर, किशोर भंगाळे, महेश सोनवणे, विनायक शिवरामे, शेख रीजवान भाई, आरीफ भाई (कालू) , डॉ.ऐहसान अहमद, पवन मराठे, रवी पाटील, लाला धनगर, वैभव पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.