वरणगाव। येथील ख्वाजा नगरातील राहिवाशी सांडू शाह फकीर यांचा मुलगा मोहम्मद मुस्तफाशाह फकीर (वय6) हा सांयकाळी खेळत असतांना अचानक त्याच्या पायाला सर्पदंश झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना काल मंगळवार 4 रोजी सांयकाळी 7.30 वाजेच्या दरम्यान राहत्या घराजवळ घडली.
याबाबत त्यांच्या नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, प्रतिभा नगरजवळील ख्वाजानगरातील रहिवाशी सांडू फकीर व्यवसाय हातमजूरी करुन आपल्या कुंटूबाचा उदरनिर्वाह करीत होता. मंगळवार 4 रोजी सायंकाळी 7.30 वाजेच्या दरम्यान मोहम्मद हा बालक मित्र व भावांसोबत घरासमोरील केरकचरा व गल्लीच्छ घाण पडलेल्या पंटागंणात खेळत असतांना अचानक सर्पदंश केल्याने मोहम्मद हा बालक काहीतरी चावल्याची कल्पना आईला दिली. आईने त्याला वरणगाव ग्रामीण रुणालयात आणले असतां डॉक्टरांनी उपचार सुरु करण्यापूर्वी मोहम्मदचा मृत्यू झाला होता. सांडू शाह फकीर यांना तीन मुले व एक मुलगी असा परिवार आहे.