जिल्हा नियोजन समिती सभेत पालकमंत्र्यांकडे नगराध्यक्ष सुनील काळे यांची मागणी
भुसावळ- जिल्हा नियोजन समितीची सभा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झाली. सभेत जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा वरणगावचे नगराध्यक्ष सुनील काळे यांनी सभेत वरणगाव शहरासाठी तीन कोटींचा सांडपाणी प्रकल्पाला मंजुरी मिळून प्रत्यक्षात कामालाही सुरुवात झाली तत्कालीन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकार्यांयांनी मनमानी पद्धतीने तीन कोटींच्या निधीचा अपवय करून मनमानी पद्धतीने काम चालवल्याने या अधिकार्यांची चौकशी करून बंद पडलेल्या सांडपाणी प्रकल्पाच्या कामाला पुन्हा चालना देण्याची मागणी केली. काळे म्हणाले की, संपूर्ण शहराचे सांडपाणी थेट प्रकल्पापर्यंत गटारीच्या माध्यमातून नेणे आवश्यक असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने भोगावती नदीत हे पाणी सोडून नियमबाह्य पद्धतीने काम करून भोगावती नदी प्रदूषित करीत शहरात दुर्गंधी पसरवली असल्याचे पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. भोगावती नदी प्रदूषित करणार्या अधिकार्यांविरुद्ध गुन्हे दाखल करून सरकारचा तीन कोटी रुपयांच्या निधीचा अपव्यय करण्यार्या अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी केल्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी याबाबतच चौकशी करून तत्काळ कारवाईचे आदेश दिले. जिल्हा नियोजन समिती सदस्यांना प्रत्येकी 20 लाखांचा निधी अद्यापपर्यंत मिळालेला नसून तसेच जिल्ह्यातल्या नगरपरीषदांना सुद्धा भरीव निधी देउन जिल्हा प्रशासनाने दखल घेण्याची मागणी पालकमंत्र्यांकडे करण्यात आली.