स्थायी समितीची बैठक ; शहर विकास झपाट्याने होणार -सुनील काळे
वरणगाव- वरणगाव पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत पाच कोटी 37 लक्ष 38 हजार 561 रुपयांच्या विकासकामांना सोमवारी मंजुरी देण्यात आली. शहराचा चौफेर विकास होणार असल्याची ग्वाही याप्रसंगी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी दिली. सभेस उपनगराध्यक्ष शेख अखलाक शेख युसूफ, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, महिला बालकल्याण सभापती माला मेढे, बांधकाम सभापती शशी कोलते, पाणीपुरवठा सभापती विकिन भंगाळे, कार्यालय अधीक्षक गंभीर कोळी, राजु गायकवाड उपस्थित होते.
वरणगाव शहराचा होणार कायापालट
वरणगाव शहरातील रस्ते आणि पेव्हर ब्लॉक व बुद्ध विहार तसेच विविध विकास कामांना मंजुरी दिल्याने शहरातील रखडलेला विकासाची कामे मार्गी लागणार असल्याने विकासाचे एक पर्व वरणगाव शहरात सुरू झाल्याची भावना नगराध्यक्ष सुनील काळे यांनी व्यक्त केली. मंजूर कामांमध्ये रस्त्यांचे काँक्रिटीकरण, प्रभाग क्रमांक दोनमध्ये पेव्हर ब्लॉकच्या कामांना मंजुरी, प्रभाग चारमध्ये रस्ता काँक्रिटीकरण कामाला मंजुर तसेच पेव्हर ब्लॉकच्या कामांना मंजुरी, प्रभाग सहा व सात, आठमध्ये रस्ता काँक्रिटीकरण याशिवाय विविध विकासकामांना सोमवारी स्थायीच्या सभेत मंजुरी मिळाली.